अमित शाह ‘इन अॅक्शन’; मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी जाहीर

    दिनांक  04-Jun-2019नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मिरात सक्रिय असलेल्या १० मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत. गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत रियाज नाइकू उर्फ मोहम्मद बिन कासिम (ए++ श्रेणी), वसीम अहमद उर्फ ओसामा (लष्कर-ए-तोयबाचा जिल्हा कमांडर), मोहम्मद अशरफ खान उर्फ अशरफ मौलवी, मेहराजुद्दीन, सैफुल्लाह उर्फ सैफुल्ला मीर उर्फ सैफ (तिघेही हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित) अशरफ उल हक (ए++ श्रेणी, हिजबुल मुजाहिद्दीनचा जिल्हा कमांडर), हाफिज उमर (जैश-ए-मोहम्मदचा कमांडर, पाकिस्तानी नागरिक), जहीद शेख उर्फ उमर अफगानी (जैश-ए-मोहम्मदचा सदस्य), जावेद मट्टू उर्फ फैसल उर्फ साकिब उर्फ मूसाब (अल-बदरचा सदस्य), एजाज अहमद मलिक (हिजबुल मुजाहिद्दीनचा कुपवाडा जिल्हा कमांडर) या कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे.

 

फुटीरतावाद्यांना १० दिवसांची एनआयए कोठडी

 

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडे जम्मू-काश्मीरमधील आसिया अंद्राबी, मसरत आलम, शब्बीर शाह या तिघा फुटीरतावाद्यांचा ताबा देण्यात आला आहे. दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयात आज या प्रकरणी सुनावणी झाली. त्यात अंद्राबी, आलम आणि शाह यांना एनआयएच्या १० दिवसांच्या कोठडीत पाठवण्याचे निर्देश देण्यात आले. जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदशी हातमिळवणी करून दहशतवादी कारवायांना आर्थिक रसदपुरवठा करणे तसेच दगडफेकीसारख्या घटनांतील सहभागाचा आरोप या तिघांवर आहे. दरम्यान, या तिघांपैकी एक असलेला मसरत आलम हा फुटीरतावादी गट हुरियत कॉन्फरन्सचा सचिव असून त्याला सय्यद अलीशाह गिलानी यांच्या जवळचे मानले जाते. दरम्यान, जम्मू-काश्मिरातील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने कोठडी सुनावलेल्यांना वाचवताना हा अन्याय असल्याचे म्हटले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat