प्रसार भारतीची स्वायत्तता अबाधित ठेवणार - प्रकाश जावडेकर

    दिनांक  04-Jun-2019


 

माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून प्रकाश जावडेकर यांनी नुकतेच आपल्या कामाला सुरुवात केली. आणि लगेचच त्यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यापैकी एक म्हणजे प्रसार भारतीच्या स्वायत्तते विषयीचा निर्णय. प्रसार भारतीची स्वायत्तता महत्त्वाची असून नवे सरकार ती कायम ठेवणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. नवी दिल्ली येथे दूरदर्शन भवनमध्ये प्रक्षेपणासाठी उपयुक्त १७ अत्याधुनिक वाहने `डीएसएनजी व्हॅन्स`चे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. या व्हॅन्समुळे प्रक्षेपणाची विश्वासार्हता वाढण्यास देखील मदत होईल असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.


 
 

प्रसार भारतीने व्यवस्थित काम करावे तसेच नवे कार्यक्रम आणि परिमाण शोधावेत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमांची जावडेकर यांनी यावेळी प्रशंसा केली. सार्वजनिक प्रसारण क्षेत्रात काम करताना प्रसारभारती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने सर्वांचा विश्र्वास प्राप्त करण्याच्या दिशेने पुढे जात असल्याचे प्रसारभारतीचे अध्यक्ष सूर्यप्रकाश यावेळी म्हणाले.

 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat