आयपीआरएसचा महसूल ४५ कोटींवरून १६५ कोटींपेक्षा जास्त

    दिनांक  04-Jun-2019मुंबई : द इंडियन परफॉर्मिंग राईट सोसायटी (IPRS), ही गीतकार, संगीत निर्माते आणि संगीत प्रकाशकांसाठीची भारताची एकमेव नोंदणीकृत कॉपीराईट सोसायटी आहे. अलीकडेच टोकियो येथे संपन्न झालेल्या सीआयएसएसी जनरल असेम्ब्लीमध्ये एरीक बाप्टीस्ट, या सीआयएसएसीच्या चेअरपर्सन ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने ही जगातील वेगाने वाढणारी कॉपीराईट सोसायटी असल्याचे घोषित केले.

 

टोकियो येथे पार पडलेली सीआयएसएसी'ची जनरल असेम्ब्ली २०१९ म्हणजे अनेक वर्षांतून पहिल्यांदा आशियात आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम ठरला आणि हा जपानमधील नव्या युगाचा भाग आहे. आयपीआरएससह अनेक प्रतिनिधी हे ग्लोबल कॉपीराईट सोसायटीजशी निगडीत असून त्यांनी सोहळ्याला हजेरी लावली. जपानचे पंतप्रधान आबे शिंजो यांनी केवळ सोहळ्याला उपस्थितीच लावली नाही, तर सीआयएसएसी लीडर्सची भेटही घेतली. त्याचप्रमाणे त्यांनी जपानसह जागतिक निर्मात्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले.

 

आयपीआरएसचे सीईओ राकेश निगम म्हणाले की, "मागील वर्षाच्या तुलनेत आयपीआरएसचा महसूल/ कलेक्शन ३५०% नी वाढले आहे. ते ४५ कोटींवरून अंदाजे १६५ कोटींपेक्षा जास्त रुपयांवर पोहोचले. चेअरमन जावेद अख्तर आणि मंडळाच्या इतर सदस्यांमुळे हे शक्य झाले. पुढे मार्गक्रमण करताना, मला आशा वाटते की, आयपीआरएस याच दराने प्रगती करेल. कारण तिला कायद्याची बळकटी प्राप्त झाली आहे".

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat