प्रतापगडावर जाणाऱ्यांना आता 'रोप वे'ची सफर

    दिनांक  30-Jun-2019मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा साक्षीदार असलेला प्रतापगड म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी. हा सर करणे आता सहज शक्य होणार आहे. महाबळेश्वरमधील जावळी गावातून प्रतापगडावर जाण्यासाठी 'रोप वे' प्रकल्पाला शासनाने मान्यता दिली आहे. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली.

 

पर्यटन धोरण २०१६ अंतर्गत या रोपवे प्रकल्पाला विशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे. जावळी गाव ते लँडविक पॉईंट तसेच प्रतापगड असा हा ५.६ किमी लांबीचा विशाल रोपवे प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे भविष्यात प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांना चढण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार असून गडावर जाणे सोपे होणार आहे.

 

"राज्यातील गडकोट किल्ले संवर्धनासाठी शासन व्यापक प्रयत्न करीत आहे. प्रतापगडावर होणारा रोपवे प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा प्रकल्प असेल. या रोपवेमुळे महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवात भर पडणार आहे. यामुळे पर्यटकांची संख्याही वाढणार असून छत्रपती शिवरायांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे." असे रावल यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat