ममतांचा चिडकेपणा; भाजप कार्यालयावर केला कब्जा

03 Jun 2019 16:56:45




कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजप द्वेष सर्वसृत आहे. त्यांच्या भाजप द्वेषाचा आणखी एक प्रकार समोर आला असून ममतांनी भाजपच्या कार्यालयावर कब्जा केला आहे. उत्तर २४ परगना जिल्ह्यात हा प्रकार घडला. ममतांनी स्वतः भाजप कार्यालयाचे कुलुप तोडून भाजपचे नाव आणि पक्षाचे चिन्ह खोडून काढले. यानंतर ममतांनी स्वतःच्या हाताने तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव लिहिले.

 

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी ममतांच्या या कृत्याचा निषेध केला असून ममता भाजपच्या विजयामुळे व्यथित झाल्याची त्यांनी टीका केली. आसनसोल मतदारसंघातून त्यांच्यासाठी 'गेट वेल सून' ची पत्रे पाठवणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, हे कार्यालय आधी तृणमूल काँग्रेस पक्षाचेच होते. त्यावर भाजपने अनधिकृत ताबा मिळवल्याचा आरोप ममतांनी केला. आम्ही फक्त आमचे कार्यालय पुन्हा आमच्या ताब्यात घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0