स्वप्नील जोशीच्या 'मोगरा फुलला' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

03 Jun 2019 18:26:34



श्रावणी देवधर दिग्दर्शित आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (जीसिम्स) च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार निर्मित मराठी चित्रपट मोगरा फुललामध्ये स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १४ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी आता एकदम नव्या लूकमध्ये या चित्रपटात प्रेक्षकांसमोर येणार आहे. स्वप्निल जोशीच्या नव्या अवतारामुळे तसेच श्रावणी देवधर पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच आणि संगीत अनावरण सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला.

 

या ट्रेलरमध्ये स्वप्नील जोशी नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या भूमिकेत आहे दिसत आहे, लग्न होत नसलेला तरी आईवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलाच्या भूमिकेत स्वप्नील पाहायला मिळत आहे. तर नीना कुळकर्णी यांनी त्याच्या आईची भूमिका साकारली असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे स्वप्नीलच्या काकाची भूमिका साकारत आहेत. नाजूक नात्यांचा गुंफलेला गजराया वाक्याला तंतोतंत जुळेल असा हा मोगरा फुललाचित्रपटाचा ट्रेलर असून यावरून अस वाटतंय की, हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या कायम समरणात राहील यात काही शंका नाही.

 

या चित्रपटामध्ये स्वप्निल जोशी, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, संदीप पाठक, आनंद इंगळे, यांशिवाय सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नाळीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

 

मोगरा फुललाला रोहित राऊतने संगीत दिले असून यातील गाणी शंकर महादेवन, बेला शेंडे, जसराज जोशी आणि रोहित राऊतने गायली आहेत. हलके अन हळुवारसा.. हो मुका अन अलवारसा...या नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या आणि शंकर महादेवन यांनी गायलेल्या गाण्याला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. त्याआधी रोहित राऊतने संगीतबद्ध केलेले व गायलेले श्रवणीय असे 'मनमोहिनी' हे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे रोहित राऊत आणि बेला शेंडे यांनी गायले असून स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांच्यावर चित्रित झाले आहे. त्यालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटातील मारवाहे गाणे आघाडीचा गायक जसराज जोशी याने गायले आहे.

 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0