वादग्रस्त ट्विट: निधी चौधरींची रवानगी पालिकेतून मंत्रालयात

    दिनांक  03-Jun-2019मुंबई : महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांच्यावर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तात्काळ दाखल घेऊन चौधरी यांची महापालिकेतून मंत्रालयात उचलबांगडी केली आहे. तसेच, या संबंधित ट्विटवरून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 

नोटांवरुन महात्मा गांधींचे फोटो हटवण्याची मागणी करत ट्विटरवर नथुराम गोडसेचे आभार मानल्यामुळे मुंबई महापालिकेच्या उपायुक्तपदी असलेल्या निधी चौधरी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. ट्वीट वादग्रस्त ठरत असल्याचे लक्षात येताच निधी चौधरींनी ट्वीट डिलीट करुन आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat