राज्यात स्वाइन फ्लूमुळे १७७ रुग्णांचा मृत्यू

03 Jun 2019 17:44:08



मुंबई : जानेवारी ते मे अखेर राज्यात स्वाइन फ्लूमुळे १७७ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. आशादायक म्हणजे, आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्याने स्वाइन फ्लूच्या प्रार्दुभावामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

जानेवारीमध्ये ११७ रुग्ण आढळून आले यापैकी २६ रुग्णांचा मृत्यू झाला. फेब्रुवारीमध्ये ४०१ रुग्ण आढळून आले तर ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. मार्चमध्ये ५८५ रुग्ण आढळून आले यापैकी सर्वाधिक ६३ रुग्णांचा मृत्यू झाला. एप्रिलमध्ये ३२८ रुग्ण आढळून आले तर ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. मेमध्ये १८८ रुग्ण आढळले त्यापैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच १० मे नंतर राज्यात स्वाइन फ्लूमुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0