इंग्लंडमध्ये दिसणार 'भगव्या जर्सी'ची जादू!

    दिनांक  29-Jun-2019


 

भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीची बीसीसीआयने केली घोषणा


मुंबई : भारतीय क्रिकेट संघ आता निळ्या येवजी भगव्या जर्सीत दिसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबतची घोषणा केली. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर जर्सीचे फोटो शेअर करत याबाबतची घोषणा केली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून जर्सीच्या रंगावरून सुरु असलेला वाद अखेर थांबला आहे.

 

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ ३० जून रोजी खेळल्या जाणाऱ्या इंग्लड विरुद्धच्या सामन्यात भगव्या रंगाची नवी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. विश्वचषक सुरु होण्यापूर्वी आंतराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) इंग्लंड वगळता प्रत्येक संघाला दोन रंगाच्या जर्सी तयार ठेवायला सांगितले होते. यामागे home आणि away ही संकल्पना असल्याचे बोलले जाते.

 

आयसीसीच्या आदेशानुसार बीसीसीआयने निळया जर्सीशिवाय Away संकल्पनांच्या नव्या जर्सीसाठी भगवा रंग निवडला. यावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. मात्र अखेर बीसीसीआयने शुक्रवारी रात्री नव्या रंगाच्या जर्सीची घोषणा केली आहे. या जर्सीमध्ये भगव्या आणि निळ्या रंगाचा समावेश करण्यात आला असून समोरील भागावर भगवा व निळा रंग असेल तर मागील बाजूस पूर्णपणे भगवा रंग असणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat