'एसएफसी एनवायरमेंटल टेक्नॉलॉजी'ला वॉटर मॅनेजमेंट एक्सलेन्स पुरस्कार

29 Jun 2019 19:22:31


 


नवी दिल्ली : पाण्याचा पुनर्वापर करण्याचे तंत्र विकसित करणाऱ्या 'एसएफसी एनवायरमेंटल टेक्नॉलॉजी' कंपनीला 'असोकॅम इंडीया'चा वॉटर मॅनेजमेंट एक्सलेंस पुरस्कार मिळाला आहे. पर्यावरण क्षेत्राला योगदान देणाऱ्या कंपन्यांच्या कार्याला गौरविण्यात येते. शुक्रवार, दि. २८ जुलै रोजी हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पाणी नियोजन व पुनर्ववापर करणाऱ्या कंपन्यांनाचा नवी दिल्लीतील ले-मरीडिन येथे झालेल्या परिषदेत गौरव करण्यात आला.

 

 
 

एसएफसी ही जागतिक पर्यावरण तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी असून महापालिका, नगरपालिका संस्थाना मलनिस्सारण, कचरा निर्मूलन आदी कामांसाठी यंत्रणा पुरवण्याचे काम करते. केंद्रीय कॅबिनेट मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पाणी व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांचा गौरव करताना नाविन्यपूर्ण संकल्पना, संशोधन, व्यावसायिक संकल्पना, जलसंवर्धन आदी क्षेत्रात महत्वाचे योगदान करणाऱ्या कंपन्यांचा याद्वारे गौरव करण्यात येतो. 'एससीएस'तर्फे जागतिक पातळीवर पाण्याच्या पुनर्वापर प्रक्रीयेत महत्वाचे योगदान आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0