पुण्यात इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १६ जणांचा मृत्यू

    दिनांक  29-Jun-2019
                                                                                       
                                                                              

पुणे : कोंढवा भागात सोमजी पेट्रोल पंपाजवळील इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्री १.३० च्या सुमारास ही दुर्दैवी दुर्घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे आणि एनडीआरएफ दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अल्कन स्टायलस या सोसायटीची संरक्षक भिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळली. यात १६ मजुरांना आपला जीव गमवावा लागला. संरक्षक भिंतीला लागुनच बांधकाम मजुरांच्या झोपड्या होत्या. आल्कन स्टायलस या सोसायटीच्या बाजूला इमारतीचे काम सुरू होते. इमारतीचा पाया बांधण्यासाठी ४० ते ५० फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. मुसळधार पाऊस आणि खोदाकामामुळेच इमारतीची संरक्षक भिंत कोसळून मजुरांच्या झोपड्या जमीनदोस्त झाल्या, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. दरम्यान, मृतांमध्ये ११ पुरुष, ३ महिला आणि ४ मुलांचा समावेश आहे.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat