पावसाळ्यात आता ना डाग ना बॅक्टरीया!

    दिनांक  28-Jun-2019

 

 
जून महिना म्हणजे पावसाळा, सुखद गारवा, सगळीकडे हिरवाई, शाळेची सुरुवात, नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास आणि नवा युनिफॉर्मसुद्धा. त्यामुळे पावसाळा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो! विशेषतः लहान मुलं या पावसाळ्याचा आनंद पुरेपूर लुटतात. नव्याकोऱ्या युनिफॉर्मची तमा न बाळगता ते मुक्तपणे, शाळेसमोर साचलेल्या पाण्यात खेळतात. साहजिकच कपड्यांवर चिखलाचे डाग पडतात. अर्थात लहान मुलांच्याच नव्हे तर प्रत्येकाच्याच कपड्यांवर चिखलाचे डाग पडतात. कारण रस्त्याने येता-जाता चिखल कपड्यांवर उडतोच.
 
 

त्यामुळे विशेषतः गृहिणींसाठी पावसाळा हा त्रासदायक काळ. कारण कितीही मेहनत घेतली तरी कपड्यांवरचे चिखलाचे डाग पूर्णपणे जात नाहीत. त्यासाठी अधिक प्रमाणात डिटर्जंट वापरलं किंवा अधिक जोर लावला तर कपड्यांचे धागे कमकुवत होऊन कपडे लवकर फाटतात. त्याशिवाय सतत पावसाची भीती असल्याने कपडे उघड्या जागी वाळत टाकता येत नाहीत ते घरातच वाळवावे लागतात . हवेतल्या ओलसरपणामुळे ते नीट वाळत नाहीत आणि कपड्यांना एक प्रकारचं कुबट वासदेखील येतो.

 

आता मात्र या सर्व समस्यांवर एकच उपाय उपलब्ध झालेला आहे तो म्हणजे पितांबरी क्लेन्झ नॅनो वॉश डिटर्जंट पावडर. यात आहेत सिल्व्हर नॅनो पार्टिकल्स. नॅनो म्हणजे अतिसूक्ष्म. हे नॅनो पार्टिकल्स कपड्यांच्या धाग्याधाग्यात शिरून त्यात अडकलेला मळ नाहीसा करतात.त्या मळासोबतच त्यात अडकलेल्या बॅक्टरीयांचाही नाश होतो. हेच बॅक्टरीया कपड्याला येणाऱ्या कुबट वासाला आणि घामाच्या दुर्गंधीला कारणीभूत असतात. त्याबरोबरच हे नॅनो पार्टिकल्स कपड्यावर एक सूक्ष्म आवरण तयार करतात. ज्यामुळे बॅक्टरीया पुन्हा कपड्यांवर ऐकू शकत नाहीत.

 

अशा रितीने क्लेन्झ नॅनो वॉशमुळे कपडे स्वच्छच नाही तर निर्जंतुक अर्थात आरोग्यदायी देखील होतात. याशिवाय यातल्या ब्राइटनिंग एजंट्समुळे कपड्यांना मिळतो उजळपणा आणि फॅब्रिक गार्डमुळे मिळते कपड्यांच्या धाग्यांची सुरक्षा. शिवाय वॉटर सॉफ्टनिंग एजंटमुळे ही पावडर जाड पाण्यातदेखील विरघळते आणि डिटर्जन्टची कार्यक्षमतादेखील राखून ठेवते धुलाईनंतर कपड्यांना प्रसन्न सुगंधदेखील मिळतो. त्यामुळे आता विसरा कपड्यांवरच्या डाग आणि दुर्गंधीला, बिनधास्त एन्जॉय करा पावसाळा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat