निजामाच्या ३०८ कोटींसाठी सुरू आहे भारत-पाकमध्ये 'युद्ध'

    दिनांक  28-Jun-2019


नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर हैदराबादचे निजाम ३०८ कोटींच्या मालमत्तेसाठी भारतासह पाकिस्तानही हक्क गाजवत आहे. १९४८ मध्ये ही रक्कम हैदराबादचा तत्कालीन निजाम याने उस्मान अली खानने पाकिस्तानच्या ब्रिटनस्थित उच्चायुक्त हबीब इब्राहिम रहीमटोला यांच्या लंडन येथील बॅंकेच्या शाखेत जमा केली होती. त्यावर भारत आणि पाकिस्तान आपला हक्क सांगत आहे.


 

 

भारताच्या बाजूने लागू शकतो निकाल

हा निकाल भारताच्या बाजूने लागू शकतो कारण, लंडन येथील नेटवेस्ट बॅंकेसह पीएलसी येथील जमा रक्कमेच्या संदर्भात हैदराबादस्थित आठवे निजाम प्रिंस मुकर्रम जेह आणि त्यांचा बंधू मुफाखाम यांनी कायदेशीर लढाईत भारताशी हातमिळवणी केली आहे. पुढील सहा आठवड्यात या लढाईचा निकाल लागू शकतो. भारतातील निजामाच्या वंशजांनी त्यावर आपला हक्क सांगितला आहे. राष्ट्रपती, निजाम, भारत सरकार यांच्यात सुरू असलेला हा खटला न्यायाधीश मार्कस स्मिथ यांच्या न्यायालयात सुरू आहे.

भारताचा हक्क यासाठी...

अंतिम निजाम ओस्मान अली खान यांना भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीवेळी कोणत्या देशात जायचे याबद्दल संभ्रम होता. त्यावेळी ही रक्कम लंडनस्थित बॅंकेत जमा करण्यात आली. त्यावेळी ज्या देशात ते आपले संस्थान सामाविष्ठ करतील त्यांना आपली संपत्ती द्यावी लागणार होती. निजामाच्या मृत्यूनंतर या पैशांवर भारताने हक्क सांगितल्यावर नेटवेस्ट फंड सुरक्षेसंदर्भात पाकिस्तानी उच्चाधिकाऱ्यांनी ही रक्कम स्वतःजवळ ठेवली. यासाठी ही कायदेशीर लढाई, सुरू आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat