मुंबईत पहिल्या पावसाचे ३ बळी

    दिनांक  28-Jun-2019मुंबई : शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसाने मुंबई शहर जलमय झाली आहे. अशामध्ये अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हीच पावसाची स्थिती पुढील २४ तास कायम राहणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. या पावसामध्ये आतापर्यंत शॉक लागून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अंधेरीमध्ये एकाच तर गोरेगावमध्ये दोघांचा समावेश आहे.

 

अंधेरीतील अण्णानगर आरटीओ ऑफिससमोर शॉक लागून काशीमा युडियार (वय ६०) या जखमी झाल्या होत्या. उपचारासाठी त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत. तर, दुसऱ्या घटनेत गोरेगाव येथे शॉक लागून चार जण जखमी झाले आहेत. या सर्वांना गोरेगावमधील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र चार पैकी दोघांना मृत घोषित केले. राजेंद्र यादव (वय ६०) आणि संजय यादव (वय २४) अशी मृतांची नावे आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat