भारताचा वेस्ट इंडीजवर 'विराट' विजय

    दिनांक  27-Jun-2019मँचेस्टर : भारत आणि वेस्ट इंडिजच्या निर्णायक सामन्यामध्ये भारताने १२५ धावांनी विजय मिळवला. भारताची सुरुवात खराब झाली असली तरी कर्णधार विराट कोहलीने एक बाजू सावरत ८२ मध्ये ७२ धावांची खेळी केली. त्यानंतर महेंद्र सिंग धोनी आणि हार्दिक पांड्याच्या तडाखेबाज खेळीमुळे भारताला ५० षटकांमध्ये ७ बाद २६८ धावांची मजल मारता आली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची कंबरडेच मोडले. त्यांचा संघ १४३ मध्ये सर्वबाद झाला. विराट कोहलीने सामानावीराचा 'किताब पटकावला.

 

भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला सलामीवीर रोहित शर्मा आणि के.एल राहुलने संथ सुरुवात केली. परंतु रोहित अवघे १८ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या कप्तान कोहलीने राहुल्याच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचली. त्यांनतर राहुल अर्धशतकापासून अवघे २ धाव दूर असताना जेसन होल्डरने त्याची विकेट घेतली. त्यानंतर मधल्या फळीच्या एकाही फलंदाजाला चांगली धावसंख्या उभारता आली नाही. तर दुसरीकडे कोहलीने एकाकी झुंज देत ७२ धावांची संयमी खेळी केली. त्यानंतर धोनी आणि पांड्याने स्फोटक फलंदाजी करत अनुक्रमे ५६ आणि ४६ धावांचे अमूल्य योगदान दिले.

 

२६९ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ मात्र पूर्णतः कोलमडला. सर्वांच्या नजर खिळून असलेल्या ख्रिस गेलेला शमीने अवघ्या ६ धावांवर बाद केले. त्यानंतर त्यांचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. भारताकडून मोहम्मद शमीने सार्वधिक ४ विकेट घेतले तर बुमराह आणि चहलने प्रत्यकी २ विकेट घेतले. त्यानंतर पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १ विकेट घेऊन भारताचा विजय सोप्पा केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat