मानपाडा उद्यानात बिबट्याचे दर्शन

26 Jun 2019 11:05:14



ठाणे : ठाणे मानपाडा निसर्ग उद्यानात प्रभात फेरीसाठी जाणाऱ्या काही जणांना बुधवारी बिबट्याचे दर्शन झाले. मानपाडा निसर्ग उद्यानातील शासकीय विश्रामगृहानजीकच्या फुलपाखरू उद्यानात पहाटे बिबट्या घुसल्याचे काहीजणांच्या निदर्शनास आले.

 

अचानक बिबट्याला समोर पाहिल्याने त्यांचा गोंधळ उडाला. ही माहिती तेथील प्रशासनाला मिळाल्यावर बचाव पथकास पाचारण करण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वी बिबट्या कुंपणावरून उडी मारून निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 

दरम्यान, प्रभात फेरीसाठी येणाऱ्यांना अचानक बिबट्या दिसल्याने काहीकाळ गोंधळ उडाला होता. तेथील वनकर्मचाऱ्यांना ही बाब समजल्यावर प्रभात फेरीसाठी आलेल्या पासधरकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. बचाव पथकाला पाचारण करण्यापूर्वीच बिबट्याने तारेच्या कुंपणावरून उडी घेत निघून गेला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0