ई सिगारेटवर बंदी घालण्याऐवजी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा !

    दिनांक  26-Jun-2019


सीएआयटीची सरकारकडे मागणी

 
 

मुंबई : भारतातील 'इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टिम्स'वरील बंदीला विरोध दर्शवत 'कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'ने (सीएआयटी) सरकारला पत्र पाठवले आहे. ई सिगारेटवर सर्वकष बंदी घालण्याऐवजी नियमांच्या काटेकोर अंमलबजावणी करावी, असे मत 'सीएआयटी'ने मांडले आहे.

 

इलेक्ट्रॉनिक धूम्रपान साधनांवर बंदी आणण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतीच पावले उचलली आहेत. औषधांच्या तांत्रिक बाबींसंदर्भातील सर्वोच्च सल्लागार समिती असलेल्या औषध तंत्रज्ञान सल्लागार मंडळाकडून सरकारच्या या प्रस्तावाला संमती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सीएआयटीने ई सिगारेटवर सर्वकष बंदी घालण्याऐवजी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

 

अनेक प्रगत अर्थव्यवस्थांनी इलेक्ट्रॉनिक धूम्रपान साधनांच्या वापरामधील फायदे व धोक्याच्या बाजू विचारात घेण्यासाठी नियामक चौकटींची धडाडीने अंमलबजावणी केली आहे, ही बाब सीएआयटीने आपल्या पत्रातून सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat