शंभर प्रभावशाली महिलांमध्ये निर्मला सितारामन यांचा सामावेश

26 Jun 2019 12:08:17


 


लंडन : ब्रिटन-भारत यांच्यातील शंभर प्रभावशाली महिलांमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा सामावेश करण्यात आला आहे. ब्रिटनच्या मंत्री पेनी मोरडॉट यांनीही या यादीत स्थान मिळवले आहे. भाजपच्या नेत्या म्हणून त्यांचा भारतीय राजकारणात मोठा प्रभाव आहे.

 

लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलेल्या सितारामन यांनी यापूर्वी ब्रिटनमध्ये काहीकाळ नोकरी केली होती. अन्य कोणत्याही मंत्र्यांपेक्षा सितारामन यांचे ब्रिटनशी चांगले संबंध आहेत. ब्रिटनचे गृहसचिव साजिद जाविद यांनी तेथील संसदेत ही यादी सादर केली आहे. यासह ब्रिटनस्थित भारतीय उच्चपदस्थ अधिकारी रूची घनश्य़ाम यांचाही या यादीत सामावेश करण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0