भारतीय संघ अव्वल ; विराटसेनेची कामगिरी

    दिनांक  26-Jun-2019नवी दिल्ली : आयसीसी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने चांगली कामगिरी केल्यामुळे आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. इंग्लंडने विश्वचषक स्पर्धेत सलग ३ सामने गमावल्यामुळे भारताने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. भारताच्या खात्यात सध्या १२३ गुण जमा आहेत तर इंग्लंडच्या खात्यामध्ये १२२ गुण जमा आहेत. तर सध्या विश्वचषक २०१९मध्ये चांगली कामगिरी करत असलेले न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे अनुक्रमे ३ऱ्या आणि ४थ्या स्थानावर आहेत.

 

मे २०१८पासून इंग्लंड अव्वल स्थानावर होता. भारताने एकदिवसीय सामन्यांमध्ये सातत्य ठेवल्यामुळे याचा फायदा क्रमवारीत झाला आहे. आता काही दिवस तरी भारत आयसीसी कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर राहणार असे जाणकारांनी सांगितले. कसोटीमध्ये भारत ११३ गुणांसह अव्वल स्थानी आहे तर न्यूझीलंड २ऱ्या क्रमांकावर १११ गुणांसह विराजमान आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat