प्रतीक्षा संपणार... मान्सून बरसणार!

25 Jun 2019 11:16:11




मुंबई : मुंबईकरांची मान्सूनची प्रतीक्षा आता संपणार असून ४८ तासांत कधीही पाऊस बरसण्याची शक्यता आहे. अलिबागपर्यंत मान्सून दाखल झाला असून काही दिवस उशिराने येणारा पाऊस आता ताणलेली प्रतीक्षा संपवणार असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.


जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होत असतानाच जवळपास १७ दिवसांनी उशिराने हजेरी लावणार आहे. मागील ४८ तासांत पावसाने दक्षिण भारतात जोर धरत आता वेगाने पुढे सरकत आहे. सध्या कोकणात अलिबागजवळ मान्सून दाखल झाला असून तो पुढे सरकत मुंबईत बरसणार आहे. सर्व परिस्थिती पावसाला अनुकूल असल्याने कोणत्याही क्षणी पाऊस मुंबईवर बरसेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

 

राज्याच्या काही भागात पावसाने सुरुवात केली असताना मुंबईत कधी दाखल होणार याची प्रतीक्षा मुंबईकरांमध्ये होती. सोमवारी मुंबईत रिमझिम पावसाने सुरुवात केली. आता ४८ तासांत कोणत्याही क्षण मान्सून बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. २६ जूनपासून जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0