अजूनही ८३चा 'तो' विजय अविस्मरणीय...

    दिनांक  25-Jun-2019


 


मुंबई : २५ जून १९८३चा तो दिवस आजही सर्वांच्या स्मरणात आहे. भारताने क्रिकेटच्या पंढरीमध्ये कपिलने तो चषक उचलला आणि जगभरचे लक्ष भारताकडे वळवून घेतले. भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा विश्वचषकाचा अंतिम फेरीतील सामना जिंकला आणि भारताने इतिहास रचला. यानंतर बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघाकडे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्धी कमावली.

 

भारताने उपांत्य फेरीत मँचेस्टरच्या मैदानात इंग्लंडच्या संघाला धूळ चारली. त्या विश्वचषकामध्ये सगळ्यात कमकुवत मानला जाणारा भारतीय संघ एकाऐकी सर्वांच्या मनातला ताईत बनला. परंतु, लॉर्ड्स मैदानावर अंतिम सामन्यात लढाई होती ती त्या विश्वचषकाचे प्रमुख दावेदार आणि सगळ्या बलवान मानल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजशी. त्यांच्या संघात जगातील सर्वोत्तम खेळाडू होते, ज्यांनी वेस्ट इंडिजला एकहाती सामने जिंकून अंतिम फेरीत मजल मारली होती. दोन वेळा विश्वचषक नाव कोरलेल्या या संघासमोर भारताला नगण्य स्थान होते. त्यामुळे वेस्ट इंडिज तिसऱ्यांदाही विश्वचषक नाव कोरणार हेच सर्वांचे मत होते.

 

हाच तो भारतीय संघ ज्यांनी अशक्य ते शक्य करून दाखविले...

 

 
 
 

वेस्ट इंडिजचा कर्णधार क्लायव लॉइड, जगात सर्वोत्तम फलंदाज म्हणून ख्याती असलेले विवियन रिचर्ड्स आणि त्यांचे गोलंदाज यांच्यावर मात करत कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या भारतीय संघाने वेस्ट इंडिजला धूळ चारत पहिल्यांदा भारताने विश्वचषक स्वतःचे नाव कोरले. या संघाकडून कुठलीही अपेक्षा नसताना केवळ सांघिक कामगिरी आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर भारताने अशक्य ते शक्य करून दाखविले होते. त्यानंतर २८ वर्षांनंतर २०११मध्ये भारताने पुन्हा एकदा विश्वचषक आपल्या नावे केला. परंतु, १९८३च्या विश्वचषकातील हा भारतीय क्रिकेटला कलाटणी देणारा विजय ठरला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat