
मुंबई : महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. तसेच, विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला तसेच भाजपशी जवळीक करत राज्य सरकारमध्ये मंत्रीपदी शपथ घेतली. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. दुसरीकडे, विधानपरिषद उपसभापती व माणिकराव ठाकरे यांचा कार्यकाळ जुलै, 2018 मध्ये संपुष्टात आल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आमदार जोगेंद्र कवाडे यांनी उपसभापतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार नीलम गोऱ्हे यांचा मार्ग मोकळा झाला व त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat