सुजित पगारे यांचा आठवले गटात प्रवेश; रिपाइं डांगळे गटाला धक्का

23 Jun 2019 21:31:48




मुंबई : रिपब्लिकन पक्षाच्या अर्जुन डांगळे गटाचे केंद्रीय उपाध्यक्ष सुजित पगारे यांनी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइं (ए) पक्षात जाहीर प्रवेश केला. पगारे यांचा आठवले गटातील प्रवेश हा डांगळे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सुजित पगारे अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत. रिपाइंच्या अर्जुन डांगळे गटामध्ये ते केंद्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करीत होते. वांद्रे येथील संविधान बंगला येथे आठवले यांची भेट घेऊन सुजित पगारे यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.

 

आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्याची घेतलेली भूमिका योग्य असल्याचे ते यावेळी म्हणाले. यासाठी आपण आठवले यांच्या नेतृत्वात रिपाइं (ए) मध्ये प्रवेश केला असून रिपब्लिकन पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण वेळ निष्ठेने काम करण्याचा निर्धार पगारे यांनी यावेळी केला. सुजित पगारे यांचे रिपाइं (ए) मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, हेमंत रणपिसे यांनी स्वागत केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0