मोदींनी साधना केलेल्या गुहेला सुगीचे दिवस

23 Jun 2019 18:27:48



लोकांची मागणी वाढल्याने दुसरी गुहा तयार करण्यास प्रशासनाच्या हालचाली


डेहराडून : लोकसभा निवडणुकीतील सहा टप्प्यांचे मतदान आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उत्तराखंडच्या केदारनाथ येथील ज्या गुहेत रात्रभर ध्यानसाधना केली होती, त्या गुहेला नागरिकांकडून प्रचंड मागणी होत आहे. या गुहेत ध्यानसाधना करण्यासाठी भाविकांची गर्दी सातत्याने वाढत असून, पुढील १० दिवसांसाठी ही गुहा बुक झाली आहे.

 

केदारनाथला दर्शनासाठी आलेल्या अनेकांनी या गुहेचे ऑनलाईन बुकिंग केले आहे. २४ तासांसाठी १५०० रुपये भाविक मोजत आहेत. निवडणूक प्रचारकाळातील थकवा घालविण्यासाठी तसेच मन:शांती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभा क्षेत्र वाराणसी येथील मतदानाच्या दोन दिवस आधी या गुहेत ध्यानसाधना केली होती. तेव्हापासून लोकांना या गुहेविषयी आकर्षण वाटू लागले असून, आतापर्यंत अनेकांनी तिथे ध्यानसाधना केली आहे.

 

लोकांची मागणी वाढल्याने आम्हाला आता दुसरी गुहा तयार करावी लागत आहे, असे डेहराडून येथील अधिकारी बी. एल. राणा यांनी सांगितले. ही गुहा कृत्रिम नाही. त्यामुळे दुसरी गुहा तयार करण्यासाठी आम्हाला वेळ लागत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0