
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियाँमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षादलाला यश आले आहे. दक्षिण काश्मीरच्या दरमदोरा परिसरात रविवारी सकाळपासून चकमक सुरू होती. सुरक्षा दलांनी नंतरही शोधमोहीम राबवली. शोपियाँमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षादलाने या ठिकाणी शोधमोहीम सुरू केली होती. लपलेल्या दहशतवाद्याने सुरक्षादलावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षादलाने गोळीबार केला. यावेळी चार दहशतवादी ठार झाले.
काश्मीरमध्ये शुक्रवारपासून सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात चकमक पाहायला मिळत आहे. शनिवारी बारामुला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी ठार झाला होता. त्यानंतर रविवारी पुन्हा एकदा चार दहशतवाद्यांना मृत्यूच्या कुशीत धाडण्यात आले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat