आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार

22 Jun 2019 16:00:53


अद्वैत चंदन दिग्दर्शित
'लाल सिंग चड्ढा' या आगामी चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर खान तिसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. या आधी तलाश आणि ३ इडियट्समध्ये त्यांच्यातील केमेस्ट्री आपण पाहिली आहे. हा चित्रपट फॉरेस्ट गम्प या हॉलिवूडमधील चित्रपटाचा रिमेक असून, चित्रपटाची कथा अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे.

आमिर खान प्रोडक्शन आणि वायकोम १८ एकत्रितपणे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी ख्रिस्तमसमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी आज सोशल मीडियावर जाहीर केले.

या चित्रपटासाठी आमिर खान २० किलो वजन कमी करणार असल्याची देखील सध्या चर्चा आहे. शिवाय या चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. आमिर खान या पूर्वी ठग्स ऑफ हिंदुस्थान या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आला होता मात्र तो चित्रपट तगडी स्टारकास्ट असून देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. त्यामुळे 'लाल सिंग चड्ढा' हा आमिर खानचा आगामी चित्रपट प्रेक्षकांना भुरळ पाडेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0