खोकलामुक्त पावसाळा!

21 Jun 2019 16:14:16


'नेमेचि येतो मग पावसाळा' अशी एक जुनी कविता आहे. 'मग' म्हणजे उन्हाळ्यानंतर नेमाने पावसाळा येतोच असा त्या ओळीचा अर्थ आहे. त्याप्रमाणेच 'नेमेचि येतो मग सर्दीखोकला' असं म्हणावं लागेल. अर्थात इथे 'मग' म्हणजे 'पावसाळा आल्यानंतर' हे सर्वांनी ओळखलं असेलच. फक्त पावसाळाच नव्हे तर हवामानात कोणताही बदल झाला तरी सर्दी किंवा खोकला होतोच हा सर्वांचाच अनुभव आहे.

 

याचं शास्त्रीय कारण पाहायला गेलं तर हा ऋतुबदल ज्याला संधिकाल असंही म्हटलं जातं, तर या काळात वातावरणातल्या सूक्ष्म जीवांची संख्या वाढत असते. त्याचप्रमाणे वातावरणातल्या बदलांशी अनुकूल अशा रचना शरीरात तयार होण्यास काहीसा वेळ लागतो. आणि त्यामुळेच या सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. आजकाल व्हायरल इन्फेक्शन हा शब्द सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. श्वासावाटे हे सूक्ष्मजीव शरीरात सहज प्रवेश करीत असल्याने खोकला, कफ यांसारखे त्रास होतात.

 

फक्त ऋतुबदलच नव्हे तर आहारात आपण करीत असलेले बदलही खोकल्यासारख्या आजारांना कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ उन्हाळ्याच्या दिवसात आपण फ्रीजमधलं अतिशय थंड पाणी, वेगवेगळ्या प्रकारची कोल्ड्रिंक्स भरपूर प्रमाणात पितो. इतकंच नाही तर थंडीच्या दिवसांतही आईस्क्रीम खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शरीरात कफाचं प्रमाण वाढतं आणि परिणामी खोकल्यासारखे आजार होतात.

 

अनेकदा यावर तात्पुरते उपाय केले जातात. परंतु त्यामुळे खोकल्याचं मूळ कारण दूर होत नाही. यासाठी आयुर्वेदात अनेक प्रभावी वनौषधी सांगितल्या आहेत. यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास 'ज्येष्ठमध' जे घशाची सूज कमी करतं, घशातला ओलावा टिकवून ठेवतं. 'कंकोळ' हे स्वरयंत्राची ताकद वाढवतं. 'खदिर' घशातली खवखव दूर करतं. अशा अनेक गुणांनी युक्त, आवाजाची काळजी घेणारी, गोड गोळ्यांच्या स्वरूपातली 'पितांबरी कंठवटी' ज्यामुळे आता नेमेचि 'पावसाळा' येईल पण 'खोकला' नाही!

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
Powered By Sangraha 9.0