सिद्धार्थ जाधवची ही आहे 'लग्नकल्लोळ' मधील पहिली झलक

21 Jun 2019 18:11:34



'सिम्बा' चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मोहिनी घालणाऱ्या सिद्धार्थ जाधवच्या 'लग्नकल्लोळ' या आगामी चित्रपटातील त्याचा लूक नुकताच प्रेक्षकांसमोर आला. यामध्ये सिद्धार्थ एका वधू वर सूचक मंडळात नाव नोंदवायला चालला आहे असे चित्रित करण्यात आले आहे. मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ जाधवसह भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

नावाप्रमाणेच हा चित्रपट लग्नसंस्थेशी निगडित असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. लग्न ही आपल्या दृष्टीने एक खूप सुंदर गोष्ट असते. मात्र प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे लग्न ही जितकी मनमोहक गोष्ट आहे तितकेच त्यामध्ये हेवेदावे, अपेक्षाभंग होतात मात्र प्रेम असतेच. असेच आता या चित्रपटात काय लग्नकल्लोळ पाहायला मिळतो ही एक आत्सुक्याची गोष्ट आहे.

सिद्धार्थ बरोबरच या चित्रपटात भूषण प्रधान, मयुरी देशमुख, भारत गणेशपुरे, प्रिया बेर्डे, प्रतिक्षा लोणकर, सुप्रिया कर्णिक, विद्या करंजीकर, अमिता कुलकर्णी, संतोष तिरमख आणि डॉ. आशिष गोखले असे अनेक लोकप्रिय कलाकार पाहायला मिळणार आहेत.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0