
'गुलाबो सीताबो' या बहुचर्चित चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेची चित्रपटामधील पहिली झलक आज प्रेक्षकांसमोर आली आहे. एका खिन्न वृद्ध मनुष्यासारखा हा पहिला लूक दिसत आहे. शुजीत सरकार दिग्दर्शित 'गुलाबो सीताबो' या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. नुकतेच बिग बी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते, त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा अधिक वाढली.
दरम्यान अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या चेहरे आणि मराठी मधील एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत तर आयुषमान खुराना सध्या त्याचा आगामी चित्रपट आर्टिकल १५ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
शुजीत सरकार यांनी या आधी पिकूमध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केले असून, पिकू चित्रपटासाठी त्यांना अनेक प्रतिष्टीत पुरस्कार देखील मिळाले आहेत. आता हा त्यांचा दुसरा चित्रपट असल्यामुळे या चित्रपटाकडून देखील प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 'गुलाबो सीताबो' हा चित्रपट २४ एप्रिल २०२० ला प्रदर्शित होणार असल्याची माहिती प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी दिली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat