सध्या वादाच्या भवऱ्यात अडकलेल्या कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन आता यूएसए नेटवर्कच्या वेब सिरीजमध्ये एका भारतीय महिलेच्या भूमिकेमध्ये झळकणार आहे. ही वेब सिरीज एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होती मात्र काही कारणास्तव प्रदर्शनाची तारीख ऑगस्टमध्ये ठरवण्यात आली आहे. श्रुती हसन या वेब सिरीजमध्ये जेरेमी इरविन आणि ब्रायन जे. स्मिथ यांच्याबरोबर काम करणार आहे.
'ट्रेडस्टोन' नावाच्या या सीरिजच्या चित्रीकरणाला नुकतेच बुडापेस्टपासून सुरुवात झाली असून या वेब सिरीजमध्ये श्रुती हसन दिल्लीतील नीरा पटेल नावाच्या एका तरुण महिलेची भूमिका साकारणार आहे. या सीरिजच्या कथेमध्ये नीरा पटेल एक हॉटेल कर्मचारी म्हणजेच एका वेटरच्या भूमिकेत आहे. श्रुति हसन व्यतिरिक्त या सीरीजमध्ये मिशेल फोर्ब्स, पैट्रिक फ्यूजिट, माइकल जेस्टन आणि टेज हॉब्रिच हे देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.
रमीम बहरानी ही वेब सिरीज दिग्दर्शित करणार आहेत. या आधी श्रुती हसन ने तामिळ, तेलगू तसेच हिंदी चितपटांमध्ये आपल्या कामाची झलक लोकांना दाखवली आहे. आता या नव्या वेब सीरिजचे आव्हान ती कशी पेलवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat