आता 'या' भारतीय खेळांडूवरही दुखापतीचे सावट

    दिनांक  20-Jun-2019


 


लंडन : आयसीसी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतावर जणू दुखापतीने काळे ढग घोंगावत आहेत. नुकतेच शिखर धवन चांगल्या फॉर्ममध्ये असताना दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला. तर, त्यानंतर भुवनेश्वर कुमार ही जखमी आहे. आता भारताचा नवखा अष्टपैलू विजय शंकर यालाही दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिल्ली आहे. सरावादरम्यान जस्मित बुमराहचा यॉर्कर खेळताना त्याच्या पायाला लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

बुधवारी भारतीय संघ सरावाकरिता मैदानात उतरले. त्याचदरम्यान जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सराव करताना विजय शंकरच्या पायाच्या बोटाला चेंडू लागला. बुमराहच्या यॉर्कर चेंडूवर शंकरला पायाचा बचाव करता आला नाही आणि चेंडू पायाच्या बोटाला लागून तो दुखापतग्रस्त झाला. विजय शंकरच्या पायाला दुखापत झालेली असली तरीही त्यामध्ये काळजी करण्याएवढे काहीही नाही. दुखापत फारशी गंभीर नाही. दुखापतीतून तो लवकरच तंदुरुस्त होऊ शकतो, असेदेखील सांगण्यात आले आहे.

 

पहिले फॉर्मात असलेला सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडावे लागले. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये पायाचे स्नायू ताणले गेल्यामुळे मध्यगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला मैदान सोडावे लागले होते. विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारताच्या कोटामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत माहिती आल्यावरच हे प्रश्न सुटतील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat