म्हाडाची सोडत जाहीर; २१७ जणांचे गृहस्वप्न पूर्णत्वास

    दिनांक  02-Jun-2019मुंबई : म्हाडा प्राधिकरणातील मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील २१७ सदनिकांसाठी संगणकिय सोडत रविवारी काढण्यात आली. ६६ हजार ८४ अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये राशी कांबळे या सोडतीच्या पहिल्या मानकरी ठरल्या. तर, दीनानाथ नवगिरे हे दुसरे मानकरी ठरले आहेत.

 

म्हाडाच्या वेबसाइटबरोबरच फेसबुकवरही या सोडतीचे निकाल पाहता येणार आहेत. म्हाडाच्या २१७ घरांसाठीची संगणकीय सोडत म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आली. यात एकूण २१७ जण भाग्यवान विजेते ठरले आहेत.

 

म्हाडाच्या मुंबई मंडळाने २१७ घरांसाठी जाहीर केलेल्या सोडतीस नेहमीप्रमाणेच प्रचंड प्रतिसाद लाभला. या घरांसाठी ६६,०९१ जणांनी अर्ज दाखल केले होते. या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी सहकारनगर, चेंबूर येथील १७० व मध्यम उत्पन्न गटासाठी ४७ घरांचा समावेश होता. यांसाठी अल्प उत्पन्न गटासाठी ५३,४५५ आणि मध्यम उत्पन्न गटासाठी १२,६३६ अर्ज दाखल झाले होते. या दोन्ही गटांत अनुक्रमे सुमारे १०६ कोटी आणि ३७ कोटी इतकी अनामत रक्कम जमा झाली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat