झारखंडमध्ये ५ नक्षल्यांना कंठस्नान

    दिनांक  02-Jun-2019


 

नवी दिल्ली : झारखंडमध्ये रविवारी सकाळी सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झाली. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र, यात एक जवान देखील हुतात्मा झाला असून अन्य चार जवान जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

झारखंडच्या डुमका येथे रानेश्वर ठाण्याच्या हद्दीत कठलियाजवळ ही चकमक झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शिकारीपाडा आणि रानेश्वर ठाण्याच्या हद्दीतील जंगलात काही नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांतर्फे शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. शोधमोहीम सुरू असतानाच नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंधाधुन गोळीबार करण्यात आला, त्याला जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

 

जवानांच्या प्रत्युत्तरात चार ते पाच नक्षलवादी ठार झाले. पण दुर्दैवाने एक जवान शहीद झाला आणि अन्य चार जवान जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या एका जवानाला हेलिकॉप्टरने रांची येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर अन्य जखमी जवानांवर डुमका येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिसरात शोधमोहीम अद्यापही सुरू आहे. पोलीस अधीक्षक वाय. एस. रमेश यांनी याबाबत माहिती दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat