टीम इंडियाला धक्का ; विराटला दुखापत

    दिनांक  02-Jun-2019लंडन : विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास सुरु होण्याआधीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सरावादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली जखमी झाला आहे. शनिवारी साऊथेम्प्टन येथे भारतीय संघ सराव करत होता. यावेळी विराटने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचा सराव केला. परंतु सरावादरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.

 

विराट जखमी झाल्यानंतर संघाचे फिजिओ पॅट्रीक फराहत यांनी त्याच्यावर तात्काळ उपचार केले. त्यांनी विराटच्या अंगठ्यावर स्प्रे मारुन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर कोहली सराव अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला. मात्र, यानंतर अजूनपर्यंत संघ व्यवस्थापनातर्फे कोहलीच्या दुखापतीबद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. सराव करताना विराट नेमका कशामुळे जखमी झाला, हे समजू शकले नाही. तो क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला की फलंदाजी करताना याबाबत बीसीसीआयने कोणतीही माहिती दिलेली नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat