वैभव तत्ववादी, शकुंतला देवी यांच्या बायोपिकमध्ये झळकणार

18 Jun 2019 13:50:16

 
 

मराठीतील कॉफी आणि बरंच काही चित्रपटात तसेच मणिकर्णिका, बाजीराव मस्तानी सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या वैभव तत्ववादीची महान गणितीतज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनपटामध्ये एंट्री झाली आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन शकुंतला देवी यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. तिच्याचबरोबर वैभव देखील या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. विक्रम मल्होत्रा दिग्दर्शित शकुंतला देवी यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन अनु मेनन करणार आहेत.

शकुंतला देवी गणिती क्रियांमध्ये इतक्या पारंगत होत्या की त्यांना 'मानवी संगणक' अशी उपमा देण्यात आली. शकुंतला देवी या अतिशय नावाजलेल्या गणितज्ञ तर होत्याच पण त्या उत्तम लेखिका देखील होत्या. त्यांनी लिहिलेले समलैंगिक संबंधांवर आधारित पुस्तक हे या विषयावरील भारतातील पहिले लिखाण आहे. १९८२ साली शकुंतला देवी यांचे नाव त्यांच्या गणितीय प्रतिभेमुळे गिनीज बुक मध्ये देखील नोंदवण्यात आले आहे. अशा या महान गणितज्ञावरील जीवनपट केव्हा प्रदर्शित होईल याची उत्सुकता आता सर्वांनाच असणार आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0