शाहरुख आणि आर्यन खानच्या आवाजाची जादू लायन किंगमध्ये

17 Jun 2019 13:52:18

 


बॉलिवूडमधील बादशाह शाहरुख खान कित्येक वर्ष आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता या बॉलिवूडच्या बादशहाचा मुलगा आर्यन खान आपल्या आवाजाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत प्रदार्पण करत आहे. आर्यन खान आणि शाहरुख खान यांची जोडी द लायन किंग
' या हॉलिवूडच्या अनिमेशन फिल्ममधील सिम्बा आणि मुस्तफा या दोन पात्रांना आवाज देणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी एक शुभवार्ता म्हणावी लागेल.

शाहरुख खान ला बॉलिवूडमध्ये किंग खान या नावाने संबोधिले जाते आणि आता या आगामी चित्रपटात तो जंगलाच्या राजाला म्हणजेच लायन किंग ला आपला आवाज देणार आहे हा एक योगायोगच म्हणावा लागेल. बऱ्याच दिवसांपासून आर्यन खान च्या या चित्रपटातील सहभागाविषयी चर्चा सुरु होती आता ही चर्चा सत्यात उतरली आहे. आर्यन खान सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण करणार नसला तरी तो सध्या फिल्म मेकिंग आणि कॅमेरा विषयीचे शिक्षण घेत आहे. त्यामुळे पुढे मागे तो देखील या क्षेत्रात झळकला तर नवल वाटू नये.

जॉन फेवर्यू दिग्दर्शित लायन किंग येत्या १७ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट लहानग्यांबरोबरच मोठ्यांच्या देखील पसंतीस पडेल का? याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0