महाराष्ट्र मंत्रीमंडळ खातेवाटप : कुणाला कोणतं मंत्रीपद ? वाचा सविस्तर

16 Jun 2019 22:09:21



मुंबई : उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी एक दिवस नवे राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. रविवारी रात्री उशीरा नव्या मंत्र्यांचे खातेवाटप झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहीती दिली. 

 

महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप

 

· राधाकृष्ण विखेपाटील गृहनिर्माण मंत्री

· जयदत्त क्षीरसागर रोजगार हमी व फलोत्पादन

· एड. आशीष शेलार : शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

· संजय कुटे : कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण

· सुरेश खाडे : सामाजिक न्याय

· अनिल बोंडे : कृषी

· अशोक उईके : आदिवासी विकास

· तानाजी सावंत : जलसंधारण

· राम शिंदे : पणन व वस्त्रोद्योग

· संभाजी पाटील निलंगेकर : अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण

· जयकुमार रावल : अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार

· सुभाष देशमुख : सहकार, मदत व पुनर्वसन

 

राज्यमंत्री

· योगेश सागर : नगरविकास

· अविनाश महातेकर : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य

· संजय (बाळा) भेगडे : कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन

· डॉ. परिणय फुके : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), वने, आदिवासी विकास

· अतुल सावे : उद्योग आणि खणिकर्म, अल्पसंख्याक विकास व वक्फ

 

सहा मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांकडून स्वीकृत

तीन कॅबीनेट आणि तीन राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांनी हे राजीनामे स्वीकारले आहेत. यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले,गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन आणि अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे, उद्योग आणि खणीकर्म, पर्यावरण तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा समावेश आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0