IND vs PAK : सामन्यावर पावसाचे सावट

    दिनांक  16-Jun-2019


 

लंडन  भारत पाक सामन्यावर सध्या पावसाचे सावट घोंगावत आहे. टीम इंडियाच्या धडाकेबाज खेळीने एकूण ३०५ धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली (७१) आणि विजय शंकर (३) ही जोडी खेळत आहे. विश्वचषकाच्या भारत-पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धी संघात मँचेस्टर येथे सुरू असलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारताचा सलामीवर रोहीत शर्माने दमदार शतक ठोकले आहे. मात्र, त्याला साध देणारा सलामीवर के.एल. राहुल ५७ धावा बनवून तंबूत परतला. भारताचा डाव सावरण्यासाठी कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला आहे. त्यानंतर रोहीत शर्मा १४० धावांवर बाद झाला. मेहंदी हसनच्या चेंडूवर वाहब रियाझला झेल दिली.   

 

भारतीय संघात शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने विजय शंकरला संधी मिळाली. तर पाकिस्तानने दोन फिरकी गोलंदाजांना संघात सामील करून घेतलं आहे. या महत्त्वपूर्ण लढतीवर पावसाचे सावट असल्याने अनेकांच्या मनात धाकधूक वाढली होती. रोहित शर्माने ३५ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकले. १२ व्या षटकात रोहित शर्माची तुफान फटकेबाजी दिसून आली. दरम्यान शिखर धवनच्या जागी आलेल्या के एल राहुल यानेही चांगली साथ दिली आहे. रोहीत आणि के.एल राहुल याने अठराव्या षटकात शंभर धावांची भागीदारी केली. 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat