
मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवार सकाळी ११ वाजता होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. अशातच रिपब्लिकन पक्षातर्फे अविनाश महातेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महातेकर यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे पाठविली आहे.
रविवारी सकाळी ११ वाजता राजभवन येथील गार्डनवर हा शपथविधी कार्यक्रम होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांचा समावेश होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे. तर आरपीआयतर्फेअविनाश महातेकर शपथ घेणार असल्याचे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, या शपथविधी सोहळ्यात केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच दिलेले आश्वासन पूर्ण केल्याबाबत आठवले यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat