‘जनगणना २०२१’ ची ‘प्री-टेस्ट’ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार

14 Jun 2019 16:10:54



 


पहिल्यांदाच होणार ऑनलाईन पद्धतीने माहितीचे संकलन

 

मुंबई : भारताच्या महानिबंधक तथा जनगणना आयुक्त, नवी दिल्ली यांच्या कार्यालयामार्फत देशाच्या सर्वात मोठ्या प्रशासकीय कामाची म्हणजेच जनगणना २०२१ ची तयारी सुरु झाली आहे. जनगणना, २०२१च्या पूर्वतयारी अंतर्गत जनगणनेच्या सर्व टप्प्यांची रंगीत तालिम म्हणजेच "प्री-टेस्ट" संपूर्ण देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर, २०१९ या कालावधीत होणार आहे. या जनगणनेमध्ये पहिल्यांदाच माहितीचे संकलन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून त्याची चाचणी प्री-टेस्टमध्ये होणार आहे.
 

जनगणना २०२१ मधील याच बदलाचे पुणे येथील यशदा प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांनी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि गोवा राज्यांमधील प्रशिक्षकांना येथे प्रशिक्षण दिले. हे राज्यस्तरीय प्रशिक्षक पुढील टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी राज्यस्तरीय प्रशिक्षकांनी पुणे जिल्ह्यातील निवडक ग्रामीण व शहरी भागात चाचणीसाठी माहिती संकलन केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0