जॉन इब्राहिम आणि इमरान हाशमी या चित्रपटात एकत्र झळकणार

14 Jun 2019 12:08:55



'शूट आऊट ऍट वडाळा' नंतर संजय गुप्ता बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा टोळ्यांमधील युद्धावर आधारलेला चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या चित्रपटात जॉन इब्राहिम आणि इमरान हाशमी पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. तर त्यांच्याबरोबर यामध्ये जॅकी श्रॉफ, प्रतीक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोनित रॉय, सुनील शेट्टी आणि अमोल गुप्ते यांच्यासारखे प्रसिद्ध कलाकार देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

'मुंबई सागा' असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात १९८० ते १९९० सालादरम्यानचा काळ दाखवण्यात येणार असून 'बॉंबे' ची मुंबई कशी झाली यामागील पार्श्वभूमी या चित्रपटात पाहायला मिळेल. चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढील महिन्यापासून सुरुवात होणार आहे तर चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होईल अशी चर्चा आहे.

इमरान हाशमी आणि जॉन इब्राहिम यांनी दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्याबरोबर या आधी चित्रपटात काम केले आहे मात्र एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्या दोघांचे एकत्र काम बघणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान जॉन सध्या 'पागलपंती' आणि 'बाटला हाऊस' अशा दोन चित्रपटांवर काम करत आहे तर इमरान, अमिताभ बच्चन यांच्यासह 'चेहरे' या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0