आयआयटी-जेईईचा निकाल जाहीर : चंद्रपूरचा कार्तिकेय देशात प्रथम

14 Jun 2019 15:40:00



नवी दिल्ली : इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि (आयआयटी) प्रवेशसाठीच्या आयआयटी-जेईई अ‍ॅडव्हान्स प्रवेश निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या कार्तिकेय गुप्ताने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याला १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत. त्याने जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षामध्ये ३७२ पैंकी ३४६ गुण मिळवले आहेत. या आधीही जेईई मेन परीक्षेत १०० पर्सेंटाइल मिळवून तो देशात १८ वा आला होता. तर महाराष्ट्रात दुसरा आला होता.

 

यंदा जेईईमध्ये पर्सेटाइल पद्धतीचा पहिल्यांदाच अवलंब करण्यात आला होता. जागतिक स्तरावर वापरली जाणारी आणि अधिक शास्त्रशुद्ध अशी ही पद्धत आहे. हिमांशू गौरव सिंह (दिल्ली), अर्चित बुबना (दिल्ली), गिलेला आकाश रेड्डी (हैदराबाद), बत्तीपति कार्तिकेयन (हैदराबाद), निशांत अभंगी (दिल्ली), कौस्तुभ दिघे (महाराष्ट्र), थिवेश चंद्र एम (हैदराबाद), ध्रृवकुमार गुप्ता (दिल्ली) आणि शबनम सहाय (महाराष्ट्र) ही देशातील पहिल्या १० जणांची नावे आहेत.

 

या साइटवर पहा निकाल : https://jeeadv.ac.in/

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0