मंत्र्यांना घरातून काम करण्यास पंतप्रधानांची बंदी

13 Jun 2019 10:29:04



नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कामाचा पद्धती स्पष्ट करत मंत्र्यांना अनेक सूचना दिल्या. मंत्र्यांनी सकाळी ९.३०पर्यंत ऑफिसला पोहचावे आणि घरातून काम करणे टाळावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ४० दिवसांच्या अधिवेशन काळात कोणीही परदेश दौरा करु नये, असेही मोदींनी मंत्र्यांना सांगितले. इतरांपुढे आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे.

 

'गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी अधिकाऱ्यांसोबत वेळेतच ऑफिसमध्ये पोहोचायचो.' असेही मोदींनी बैठकीत सांगितले. "मंत्र्यांनी नव्याने निवडलेल्या खासदारांची भेट घ्यावी, कारण खासदार आणि मंत्री यांच्यात फार फरक नसतो. पाच वर्षांचा आराखडा बनवून कामाची सुरुवात करा आणि त्याचा परिणाम १०० दिवसात दिसला पाहिजे," अशी सूचनाही मोदींनी दिली. या बैठकीत मंत्रिमंडळाने मार्च २०१९ च्या उच्च शिक्षण संस्थांमधील आरक्षणासंदर्भातील नव्या अध्यादेशाला मंजुरी दिली. या द्वारे ७००० शिक्षकांची भरती केली जाणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0