विश्वचषक २०१९ : भारत - न्यूझीलँडवर पावसाचे सावट

    दिनांक  13-Jun-2019नवी दिल्ली : गुरुवारी भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार असून भारताचे पारडे जड मानले जात आहे. परंतु, या सामन्यावर पावसाचे सावट असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. या विश्वचषकामध्ये पावणे अनेक सामान्यांचा खोळंबा केला आहे. त्याचा सगळ्यात जास्त फटका हा श्रीलंकेच्या संघाला बसला. सलग दोन वेळा श्रीलंकेचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी ८० टक्के पावसाची शक्यता आहे.

 

भारत-न्यूझीलंड ठरणार 'कांटे की टक्कर'

 

विश्वचषक २०१९मध्ये सध्या भारतीय संघाची चर्चा आहे. तर न्यूझीलंडचा संघदेखील सध्या फॉर्मात पाहायला मिळत आहे. भारतने स्पर्धेमध्ये दोन्ही सामने जिंकले आहेत. तर, न्यूझीलंडनेदेखील ३ सामने खेळले असून तिन्हीमध्ये विजय मिळवला आहे. सध्या न्यूझीलंसंघ हा पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारत चौथ्या क्रमांकावर गेला आहे.

 

या सामन्यापूर्वी भारताला शिखर धवनच्या रूपाने चांगलाच धक्का बसला आहे. सध्या फॉर्ममध्ये असलेली रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जोडी या सामन्यामध्ये दिसणार नाही हे मात्र निश्चित. शिखर धवनच्या जागी कोणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सराव सामन्यामध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता, त्यामुळे विराटसेना कोणती रणनीती आखते? की किवी पुन्हा भारतावर वरचढ होतात? की दोघांच्या विजय रथावर पाऊस पाणी फेरतो? हे गुरुवारी कळेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat