अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गोरखे

13 Jun 2019 17:57:37



 


मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गणपत गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गोरखे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील कार्यासाठी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी गोरखे म्हणाले, अनुसूचित जाती-जमातीतील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील लोकांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास करण्यासाठी मला नियुक्त केल्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करीत आहे. साहित्‍यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना गतिमान पद्धतीने राबविण्यासाठी कसोशीने आणि निष्ठेने प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही गोरखे यांनी यावेळी व्यक्त केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0