'द्वारका एक्सप्रेस वे'च्या कामाला मिळणार गती

    दिनांक  12-Jun-2019केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या बैठकीत निर्णय

 

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यात आज नवी दिल्ली येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी द्वारका एक्सप्रेस वे आणि इतर हरियाणातील महामार्गांविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी रस्ते परिवहन राज्यमंत्री जनरल वि.के.सिंह यांच्यासह अन्य अधिकारीही उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी दुसऱ्यांदा मंत्रीपदाशी शपथ घेतल्यानंतर मनोहर लाल खट्टर यांची ही पहिली भेट होती.

 

दहा वर्षांपूर्वी उद्घाटन करण्यात आलेल्या 'द्वारका एक्सप्रेस वे' या प्रकल्पाच्या कामाच्या अनेक मुदती उलटून गेल्या असून या मार्गावर गुरुग्राम येथून जाणाऱ्या भागातील अडथळे दूर करण्यात प्रशासनाला यश आले आहे. या भागातील कामालाही गती मिळाली असली तरी दिल्लीच्या दिशेकडील जाणाऱ्या मार्गावर १३ हजार ७०० झाडांच्या पूर्नरोपणाची प्रक्रीया लालफितीत अडकली आहे. या मार्गात येणाऱ्या कारखानेही हटवण्यात आले आहेत. लोकसभा निवडणूकांपूर्वी २१ ठिकाणांपैकी २० बांधकामे हटवण्यात आलेली आहेत. आता या कामाला गती मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री खट्टर यांनी केल्याचे बोलले जात आहे. 

 

गडकरी यांच्याशी आरवली बायोडायव्हर्सिटी पार्क संदर्भात चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे तात्पूरता स्थगित करण्यात आला आहे. गुहावटी मेट्रोपोलीटीअन डेव्हलपमेंट अथॉरिटीतर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे याचा पूर्नविचार करण्याची मागणी केली आहे. याशिवाय सोहाना-अलवार महामार्गाबद्दलही या बैठकीत चर्चा करण्यात आली. या मार्गाचे काम यापूर्वीच सुरू झालेले आहे. यांसह इतर विकासकामांचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat