हिंदू देवतांच्या मूर्तींसोबत अश्लील छायाचित्रे काढणाऱ्या विकृताला अटक

    दिनांक  11-Jun-2019 


तामिळनाडू : हिंदू देवतांच्या मूर्तींसोबतची अश्लील छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकणाऱ्या मुजीबूर रेहमान या विकृत तरुणाला अटक करण्यात आली आहे. तंजावर येथील बृहडेश्वर मंदिरातील एक हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन मूर्तींसोबत अश्लील छायाचित्रे काढून या विकृत तरुणाने ती छायाचित्रे समाज माध्यमांवर टाकली होती. यासोबत त्याने ईद मुबारक असा संदेश टाकला होता. समाजमाध्यमांवर ही छायाचित्रे व्हायरल झाल्यावर हिंदू समाज आणि हिंदू समाजातील संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारींनंतर त्रिची पोलिसांनी रेहमानला अटक केली.


तंजावर येथील बृहडेश्वर मंदिर हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. चोल राजघराण्याच्या या काळात इ.स. १००३ ते १०१० दरम्यान या मंदिराची उभारणी करण्यात आली. या मंदिरास युनेस्कोने जागतिक ठेवा म्हणून घोषित केले आहे. या ऐतिहासिक मंदिरात जाऊन तेथील मूर्तींसोबत अश्लील हावभाव दर्शविणारी छायाचित्रे ईदच्या दिवशी रेहमानने काढली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat