भ्रष्ट अधिकाऱ्यांना मोदी सरकारचा दणका; बारा अधिकारी बडतर्फ

    दिनांक  11-Jun-2019


 


नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या खात्यात साफसफाई सुरु केली आहे. त्यांनी आयकर विभागातील तब्बल बारा अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली. या बारा अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्ता असे आरोप आहेत. विशेष म्हणजे यात आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तपदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

श्वेताभ सुमन, एस के श्रीवास्तव, अशोक अग्रवाल, होमी राजवंश (आयकर आयुक्त, तामिळनाडू), बी बी राजेंद्र प्रसाद (आयुक्त, गुजरात), अलोक कुमार मित्रा (आयुक्त कोच्ची), अजय कुमार सिंह (आयुक्त, कोलकाता), बी अरुलप्पा (आयुक्त, कोच्ची), विवेक बत्रा (अतिरिक्त आयुक्त, भुवनेश्वर), चंद्रसेन भारती (अतिरिक्त आयुक्त अलाहाबाद) आणि राम कुमार भार्गव (सहाय्यक आयुक्त, लखनौ) असे या अधिकाऱ्यांचे नावे आहेत. 

 

दरम्यान, मोदी सरकार -२ सत्तेवर आल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. भविष्यातही यापेक्षाही मोठी कारवाई केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat