‘जय श्रीराम’ घोषणा दिल्याने भाजप कार्यकर्त्याची हत्या

11 Jun 2019 16:16:13



कोलकत्ता : जय श्रीरामघोषणा दिल्याने भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव समतुल डोलाई असे असून त्याचा मृतदेह सरपोत गावानजीकच्या शेतामध्ये आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. डोलाई हे भाजपचे कार्यकर्ते होते. त्यांनी जय श्रीरामघोषणा दिल्यावरून तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप भाजपच्या हावडा ग्रामीण विभागाचे अध्यक्ष अनुपम मालिक यांनी केला आहे.

 

डोलोई यांच्या एका नातलगाने दिलेल्या माहितीनुसार, डोलोई हे ९ जून २०१९ रोजी एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी जय श्रीरामअशा घोषणा दिल्याने त्या कार्यक्रमात उपस्थित तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले होते. या घटनेनंतर डोलोई बेपत्ता झाले होते आणि नंतर त्यांचा मृतदेह सरपोत गावानजीकच्या शेतामध्ये शेतामध्ये आढळून आला. भाजपच्या नेत्यांनी या हत्येचा तीव्र निषेध केला असून या प्रकरणी प्रदेश भाजपने पोलिसात तक्रारही नोंदविली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0