'एएन-३२' विमानाचे अवशेष सापडले

    दिनांक  11-Jun-2019नवी दिल्ली : वायुसेनेच्या बेपत्ता झालेल्या 'एएन-३२' विमानाचे अवशेष मंगळवारी रात्री शोधपथकास आढळून आले. शोधमोहिम सुरू असताना अरुणाचल प्रदेशच्या लिपोच्या उत्तरीय भागात विमानाचे काही अवशेष आढळून आल्याची माहीती पथकाने दिली आहे. अद्यापही शोधमोहीम सुरूच असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

 

३ जून रोजी वायूसेनेचे 'एएन-३२' विमान जोराहाट या ठिकाणाहून निघाले होते. त्यात आठ कर्मचाऱ्यांसह एकूण १३ प्रवाशांचाही सामावेश होता. वायुसेनेचे प्रवक्ते कमांडर रत्नाकर सिंह यांनी दिलेल्या माहीतीनुसार, 'शोधमोहिम सुरू असून विमानाचा शोध अद्याप लागलेला नाही.'

 

या भागातील हवामान अतिशय खराब असूनही शोधमोहीम थांबविण्यात आलेली नाही. अरुणाचल प्रदेशकडे जाणाऱ्या मार्गावर हे विमान बेपत्ता झाले. या विमानाच्या शोधासाठी एसयू ३० जेट लढाऊ विमान, सी १३०जे, एमआय१७, व एएलएच हॅलिकॅाप्टर आदी यंत्रणा सुसज्ज आहे. इस्त्रोचीही विमान गायब होण्याच्या क्षेत्रावर नजर आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat